सांगली प्रतिनिधी-ज्योती मोरे
सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिक पाटील यांचे प्लॉट दाखवण्याच्या बाहण्याने अपहरण करून नंतर त्यांना मारहाण करत, हात बांधून कुंभोज ब्रिजवरून वारणा नदी टाकून दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यांचा मृतदेह कवठेपिरान हद्दीत नदी काठावर आढळून आला होता. या खुनासंदर्भात अनेक शक्यतांचा तपास करून सांगली शहर पोलीस ठाणे, ग्रामीण शहर पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना किरण लखन रणदिवे वय 26, अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर वय 22 आणि अभिजीत चंद्रकांत कणसे वय 20 या वाळवा तालुक्यातील कारंदवाडी या गावच्या तरुणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान आरोपींना पैशांची गरज असल्यानेच हे अपहरण करण्यात आले होते सुरुवातीला आरोपींनी एका व्यक्तीचा मोबाईल चोरून त्या फोनवरून प्लॉट दाखवायचा आहे असं खोटं सांगून तुंग इथं पाटील यांना बोलावून घेऊन ते आल्यानंतर आरोपींनी त्यांना पकडलं तेव्हा त्यांच्यामध्ये झटापट झाली शनिवार असल्याने तुंगाच्या मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ये जा रस्त्यावर होती त्यामुळे पुन्हा त्यांना तोंड दाबून गाडीत घालून त्यांचे हातपाय दाबून धरण्यात आले त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून गाडीच्या डिकीत घालण्यात आले.तुंगमागे कवठेपिरांच्या आड मार्गावर नेऊन गाडी थांबून पुन्हा डिगी उघडून पाहिला असता पाटील यांची काही हालचाल जाणवली नसल्याने ते मृत झाल्याची शक्यता वाटल्याने आरोपीने कवठेपिरान दुधगाव मार्गे जाऊन कुंभोज ब्रिजवरून माणिक पाटील यांना वारणा नदी पात्रात टाकलं. त्यानंतर त्यांची गाडी कोंडीग्रे फाट्यावर लावून हे तिघेही आरोपी आपल्या गावी परत आल्याचे आणि हा खून केवळ पैशांच्या गरजेपोटी करण्यात आल्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सदर क्लिष्ट असणाऱ्या घटनेचा तपास लावण्यात सांगली शहर पोलीस ठाणे, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चांगली आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कौतुक केले आहे.सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, पोलीस फौजदार विशाल येळेकर, पोलीस फौजदार मोहम्मद शेख, पोलीस फौजदार सागर पाटील, आणि सायबर सेलचे पोलीस फौजदार रोहिदास पवार यांच्यासह इतर अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.