Sunday, September 22, 2024
Homeराज्यरामटेक तहसीह कार्यालया समोर सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती सदस्यांचे आमरण उपोषण...

रामटेक तहसीह कार्यालया समोर सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती सदस्यांचे आमरण उपोषण…

उपोषणस्थळी माजी आमदार रेड्डी यांची भेट

रामटेक – अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ (वन हक्क कायदा २००६) अन्वये ग्रामसभेला प्राप्त स्वामित्व वनहक्कांच्या अंमलबजावणीत प्रशाषणाविरोधात न्याय हक्कासाठी आज दि. ६ जुन ला सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती सदस्यांनी तहसिल कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केलेले आहे.

उपोषण करणाऱ्यांमध्ये दिनकर उईके, राधेशाम मेश्राम, नरेंद्र वाळके, विकेश मसराम, कमलेश सलामे, सचिन उईके, योगेश धुर्वे, अक्षय सलामे, देवचंद भलावी, राधेशाम मेश्राम आणि नरेश केळवदे यांचा समावेश आहे. वन, तेंदुपत्ता तथा विविध मागण्यांसाठी ते येथे उपोषणावर बसलेले असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगीतले.

दरम्यान आज ६ जुन ला दुपारी ३ च्या सुमारास माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर ढोक, भाजप महामंत्री नंदु कोहळे आदी. उपस्थीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: