IND vs PAK Asia Cup T20 Live Streaming | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना रविवारी दुबईत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दहा महिन्यांनंतर दोन्ही देश आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी, दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. दोन्ही संघ आशिया चषक विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. हा सामना जिंकणारा संघ विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल टाकेल. दोन्ही संघांचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर आहेत. असे असले तरी, सामन्यात मोठी टक्कर बघयला मिळणार आहे.
शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा विराट कोहली कर्णधार होता. त्याने टी-20 विश्वचषकापूर्वीच सांगितले होते की, तो स्पर्धेनंतर टी-20 कर्णधारपद सोडणार आहे. त्याच्यासाठी कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना विसरता येणारा होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा नियमित कर्णधार झाला. पाकिस्तानचा बदला घेण्याची जबाबदारी या रोहितवर आहे.
चला जाणून घेऊया या सामन्याच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा दुसरा सामना २८ ऑगस्टला रविवारी खेळवला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?
भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार एपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
फ्री मध्ये सामना कुठे बघायचा?
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जाईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता या मालिकेचे सामने पाहू शकता.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अश्विन/आवेश खान, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.