न्यूज डेस्क : अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) ने मंगळवारी संपूर्ण भारतातील अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कचा डार्क वेबच्या माध्यमातून पर्दाफाश केला. एलएसडीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा जप्त केल्याचा दावाही त्यांनी केला.
या छाप्यात एनसीबीने लिसेर्जिक एसिड डायथिलामाइड (LSD) हे हजारो कोटींचे औषध जप्त केले आहे. एनसीबीच्या या छाप्यात देशभरात पसरलेल्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या धंद्यात क्रिप्टोकरन्सी वापरल्याचा दावा केल्या जात आहे. या छाप्यात अनेक ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. या छाप्याबाबत एनसीबी पत्रकार परिषदही घेणार आहे.
गेल्या महिन्यात, भारतीय नौदलासोबत केलेल्या विशेष कारवाईत, एजन्सीने केरळच्या किनार्याजवळ एका बोटीतून २५,००० कोटी रुपये किमतीचे 2,525 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले. संजय कुमार सिंग, डेप्युटी डायरेक्टर जनरल (ऑप्स) यांनी याला एजन्सीसाठी “मूल्यातील सर्वात मोठी ड्रग जप्ती” म्हटले आहे.
ते म्हणाले, “एनसीबी आणि नौदलाने हिंद महासागरात यशस्वी ऑपरेशन केले. त्याच्या आर्थिक मूल्याच्या दृष्टीने ही सर्वात मोठी जप्ती आहे. इराणमधील चाबहार बंदरातून याची सुरुवात झाली आणि ड्रग्सचा स्रोत पाकिस्तान आहे.”
ऑपरेशन समुद्रगुप्त नावाचे विशेष ऑपरेशन फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि आतापर्यंत 4,000 किलोपेक्षा जास्त ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
NCB busts pan-India drug trafficking cartel accused of using cryptocurrency through dark net
— ANI Digital (@ani_digital) June 6, 2023
Read @ANI Story | https://t.co/WVjN9XuWrI#NCB #drug #cryptocurrency pic.twitter.com/bCQAwtygcl