हिंगणा येथे वनराई फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतिने वृक्षारोपण…
नागपूर – शरद नागदेवे
हिंगणा – निसर्ग व मानवाचे अतूट व फार जूने नाते आहे, वृक्ष हा त्यातलाच एक भाग आहे. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात आणि मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी वृक्ष म्हत्वाचे आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले तसेच कडक उन्हाळा, प्रदूषण, तापमानवाढ अशा समस्या दिवसे दिवस वाढत आहे.
म्हणून वृक्षारोपण व संवर्धन काळाच्या गरजेसह आपली नैतिक जवाबदारी असल्याचे मत माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी हिंगणा येथे वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. जागतीक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने वनराई फाऊंडेशन नागपूर व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र वतिने हिंगणा येथे नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण व वृक्ष वितरण व विधार्थीना आंबे वाटप करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते, तर राष्ट्रीय हिन्दी भाषाचे अध्यक्ष अजय पाटील, पो.निरिक्षक वाघ, नागपूर कृउबास सभापती प्रकाश नागपूरे, वनराईचे विश्वस्त श्रीराम काळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूरचे अध्यक्ष महेश बंग, उपाध्यक्ष डॉ राजाभाऊ टाकसाडे, वनराईचे प्रकाश इटनकर, अनिल इंदाने, संजय रहाटे, नितिन जातकर आदी मान्यंवर प्रामुखयाने उपस्थित होते.
ग्राम पंचायत सुकळी (गुपचूप)चे सरपंच दिनेश ढेंगरे व रायपुर ग्राम पंचायतचे इरशान शेटे यांना प्रत्येकी २५ वृक्ष लागवडीस देण्यात आले असुन पाच शे विधार्थियांना आंबे वितरीत करून आंब्यांच्या गुठल्यांचे रोपन करण्यास सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महेश बंग यांनी केले तर आभार निलेश खांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राचार्य नितीन तुपेकर, प्राचार्य नितिन लोहकरे, शिक्षकवृंद व विधार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.