इंग्रजी माध्यमातून दीपिका चव्हाण अव्वल
पार्थ वानखडे दुसरा
पातुर – निशांत गवई
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चा दहाविचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी डिक्टिन्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पातूर शहरातून प्रथम येण्याचा मान किड्स पॅराडाईजच्या दीपिका चव्हाण या विद्यार्थिनीने (93.40 टक्के) मिळवला असुन पार्थ अरविंद वानखडे 92.80 टक्के गुण मिळवून हा दुसरा आला आहे.
शैक्षणिक सत्र 2022-23 च्या दहावीचा निकाल लागला असून यावर्षी सुद्धा किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सहा विद्यार्थी ९० टक्के च्या वर गुण मिळवून पास झाले आहेत.
यामध्ये रीना बगाडे (91.20%),शार्दूल निमकर्डे (91.20%), प्रेम मानकर (90.40%), कोमल अमानकार (90.20%), ख़ुशी राठोड (89.20%), कृतिका बोबडे (87.80%),पार्थ गजानन वानखडे (87.00%), क्रिश खोडे (86.40%),
रजा उल्लाह खान (85.80%), प्रियानी पवार (84.00%) पद्मनाभ अंधारे (82.60%) कोमल खंडारे (78.40%) विद्यार्थ्यांनी गुण मिळवून नावालौकिक मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, शिक्षक नरेंद्र बोरकर, हरिष सौंदळे, वंदना पोहरे, पल्लवी खंडारे आदींना दिले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, हरिष सौंदळे,अविनाश पाटील,बजरंग भुजबटराव, रुपाली पोहरे, शुभम पोहरे व पालक अरविंद वानखडे, जितेंद्र चव्हाण, प्रज्वल बगाडे आदी उपस्थित होते.