ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी पॅसेंजर ट्रेन कोरोमंडल एक्सप्रेसचे बोगी रुळावरून घसरले. दरम्यान, दुसऱ्या ट्रॅकवरून यशवंतपूरहून हावड्याकडे जाणारी एक्स्प्रेस गाडी उतरलेल्या बोगीच्या डब्यावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 900 प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव पथके हजर आहेत. काही जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि बालासोरच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, “सुमारे 8 ते 10 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. ही कोणत्याही ट्रेनची टक्कर नाही, मालगाडीचीही टक्कर नाही. यशवंतपूर ते हावडा ट्रेन लगतच्या रुळावरून जात असताना ट्रेन रुळावरून घसरली. दुसऱ्या बाजूला रेल्वेची बोगी रुळावरून घसरली आणि नंतर त्याचे नुकसान झाले.
ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भरपाई जाहीर केली आहे. वैष्णन यांनी ट्विट केले आहे – ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.
Visual animation of the train accident Recreated. 💔 https://t.co/Z1wMwJcSo8
— I am Venkatadri (@iamvenkatadri) June 2, 2023
#CoromandelExpress #Balasore #TrainAccident #CoromandelExpress #TrainAccident Hope Everyone will recover 🙏🙏🙏🙏🙏… pic.twitter.com/bB7uvJ6WWC
पंतप्रधान मोदींनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे- “ओडिशातील रेल्वे अपघातामुळे मी व्यथित झालो आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे शनिवारी सकाळी होणारा मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार होते. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा होणार होता.
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत-
हेल्पलाइन क्रमांक – 033 26382217, 8972073925, 9332392339, 8249591559, 7978418322, 9903370746,044- 25330952, 0347-3452, 0347-34052