सांगली – ज्योती मोरे.
काळ्यापाण्याच्या शिक्षेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांना सूट मिळाली, पण कोणतेही राजकीय काम करण्याचे नाही ही त्यांना अट घातली गेली, त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले या परिस्थितीत सावरकरांसारखा कणखर नेता गप्प बसणे शक्य नव्हते आपल्या देशातील धर्मांतरांचा प्रयोग इथल्या दलित समाजावर केला गेला कारण बहुजन समाजाने त्यांना अस्पृश्य ठरवले होते.
बहुजन समाजाचे दलित समाज बरोबर दृढ संबंध निर्माण झाले तर हिंदूंची एकजूट वाढेल तसेच अस्पृश्यतेचा आपल्या धर्मावरील कलंक नाहीसा होईल अशा स्वातंत्र्यवीरांची भावना होती त्यासाठी सावरकरांनी दलितांना मंदिर प्रवेश व सहभोजन असे कार्यक्रम करून मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता निर्मूलन केले.
स्वातंत्र्यवीरांचे हे काम मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण होय असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील. ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिर्जे, श्रीकांततात्या शिंदे, मनपा गटनेते भारतीताई दिगडे, नगरसेवक संजय कुलकर्णी, सुबराव तात्या मद्रासी, संजय यमगर नगरसेविका गीतांजलीताई ढोपे पाटील, कल्पनाताई कोळेकर, अप्सराताई वायदंडे अनारकलीताई कुरणे,
माधुरीताई वसगडेकर, वैशालीताई पाटील, प्रदेश अल्पसंख्यांक सचिव अश्रफ वांकर, शहानवाज सौदागर गौस पठाण, विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे भालचंद्र साठे, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, रवींद्र सदामते, दीपक कर्वे, विशाल पवार, पृथ्वीराज पाटील, धनेश कातगडे, बाळासाहेब बेलवलकर, अशोक पवार, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते..