अमरावती – गरीब, शेतकरी, शेत मजूर, कामगार, एससी, एसटी, ओबीसी व सर्वजातीय तथा अंतर जातीय आणि सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा आगामी 16 जुन रोजी आयोजीत करण्यात आला आहे. संंकल्प बहुउद्देशीय संस्था व्दारा हा शुभमंगल उपक्रम घेण्यात येत आहे.
लग्न करावे पाहुन
मराठीत म्हण आहे कि लग्न करावे किंवा घर बांधुन पहावे. दोन्ही मध्ये प्रचंड खर्च येत असतो. कर्ज काढणे किंवा आपली मिळकत खर्च करावी लागते. प्रचंड महागाईच्या या काळात भरन-पोषण, शिक्षण अत्यंत कठीण झालेले आहे. कर्जाची परत फेड न झाल्याने आत्यहत्या करण्याची पाळी येते, अश्या शोषीत-वंचित कुटुंबाना मदत होण्याच्या दृष्टीने आयोजन करण्यात येत आहे.
वर-वधुंना मिळेल शासकीय अनुदान
सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न करणा-या वर-वधुंना समाज सेवी नितीन कदम यांच्या संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे माध्यमातुन शासकीय अनुदान 20 हजार, 50 हजार, 70 हजार रुपए, आंतरजातीय विवाह करणा-या नवदंपत्तींना अडीच लाख रुपये मिळवण्यास सर्वोपरी मदत करतील.
गरीबांचे कैवारी नितीन कदम
समाज सेवक नितीन कदम या सामुहिक विवाह सोहळयात मुलीचे भाऊ, वडील बनुन कन्यादान करतील. गरीबांचे कैवारी म्हणुन त्यांचा नावलौकिक आहे. आपल्या घर व कुटुंबाचा विवाह म्हणुन ते सर्व मंगलविधि पूर्ण करतील.
आकर्षक भेट वस्तु
सामुहिक विवाह सोहळयात येणा-या पाहुंण्याची सरबराई व जेवन व्यवस्था , फोटो शुटींग, बैन्ड, बडनेरा रोड स्थित वातानुकुलीत सुसज्ज जाधव पैलेस मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. वधु मुलिना साडी-चोळी, बांगडी, मंगळसुत्र व नवरदेवाला आकर्षक भेट वस्तु देण्यात येईल. डॉ. रुपेश खडसे यांच्यावतीने मोफत ड्राइविंग लाइयेंस दिल्या जाईल.
उपवर-वधुंना नोंदणी करण्याचे आवाहन
सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्यास इच्छुक उपवर-वधुंना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी डॉ. रुपेश खडसे 7350712852, पंकज जाधव 9921560309, संकल्प 7722004344 वर संपर्क करु शकता. नोंदणीसाठी शाळेची टीसी, आधारकार्ड, फोटो, जातीचा दाखला, प्रथम विवाहाचा दाखला,
डोमीसाइड घेऊन 31 में च्या पुर्वी डॉ. रुपेश खडसे ड्राइविंग स्कुल, एमआयडिसी रोड, जुना बायपास रोड, प्रभादेवी मंगल कार्यालय, अमरावती किंवा संकल्प बहुउद्देशीय संस्था डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या दवाखान्या जवळ, रुक्मिणी नगर येथे संपर्क साधावा.