Friday, September 20, 2024
Homeराज्यभारत राष्ट्र समितीचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव...

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या उपस्थितीत नांदेड येथे १९ व २० मे रोजी राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

भारत राष्ट्र समितीच्या वतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथील “अनंता लॉन्स” येथे आयोजित करण्यात आले असुन या शिबिरासाठी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समिती किसान सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली आहे.

भारत राष्ट्र समिती ने राज्यात जोरदार मुसंडी मारली असुन मराठवाड्यातील झालेल्या सभांमुळे भारत राष्ट्र समितीची चर्चा राज्य भरात सुरु झाली आहे. राज्यातील गावखेड्यात के.सी.आर यांच्या विविध योजनांची चर्चा जोरदार होत असुन आता सामान्य नागरीकांसोबत प्रशासकीय अधिकारी सुध्दा राज्यात के.सी.आर यांचे तेलंगाना मॉडेल लागु करावे अशी मागणी करत आहेत.

भारत राष्ट्र समातीने राज्यातील सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे.या तयारीचा भाग म्हणुन नांदेड येथे दि.१९ व २० मे २०२३ रोजी अनंता लॉन्स येथे २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राज्य स्तरीय पहिले प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरास भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगाण राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात भारत राष्ट्र समितीची ध्येय धोरणे , प्रत्येक गावात शाखा कोअर कमिटी स्थापना अभियान (मुख्य शाखा, किसान सेल, युवक सेल, महिला सेल, एस सी सेल,

एस टी सेल, अल्पसंख्याक सेल, कामगार सेल आदी) , महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाय योजना, सह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तयारी, विधानसभा निवडणुका तयारी ,पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान व प्रचार या संबंधाने चर्चा होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: