दानापूर – गोपाल विरघट
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकजागर मंचच्या वतीने दानापूर येथिल उत्तरेकडे असलेल्या स्मशान भूमीत (गरुड धाम) मध्ये स्वछता अभियान दि , 15 मे 2023 राबविण्यात आले. यावेळी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज व स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या स्मृतींना अभिवादन करून स्वछता अभियानाला लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून लोकजागर मंच हे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे त्यामध्ये शेतकरी हिताचे प्रश्न असो , की महिला बचत गटाच्या महिला प्रशिक्षण, जल परिषद, जल मित्रांचा सन्मान ,शेतकरी सन्मान असे विविध समाज उपयोगी उपक्रम अनिलभाऊ गावंडे आपल्या लोकजागर मंच्याच्या माध्यमातून राबवीत असतात.
अकोला, बुलढाणा जिल्हयात नाव लौकीक असलेल्या या स्मशान भूमीत (गरुड धाम) मध्ये जेष्ठ नागरिकांनी जवळ जवळ 300 झाडांची वृक्ष लागवड केली आहे सोबतच विविध प्रकारचे , फुल झाडे, भव्य असे महादेव मंदिराचे बांधकाम सुद्धा या ठिकाणी करण्यात आले आहे.
यावेळी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांचा गरुड धाम सेवा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गरुड धाम अध्यक्ष विश्वासराव विखे , राजुसिंग ठाकूर, भास्कर गावंडे, भास्कर विखे, अरुण विखे , गोपाल दाते, श्रीकृष्ण भगत, भास्कर गोरे, कुवरसिंग ठाकूर,लोकजागर चे अभिजित विखे, मुकेश विखे, दिलीप पिवाल ,
दीपक अहेरकर, विलास बेलाडकर, गोपाल जळमकर , कैलास दामधर, विनोद सगणे, शिवा दिंडोकार, ग्रा, प ,सदस्य गणेश सांगूनवेडे,तुकाराम शित्रे, लक्ष्मण जामोदकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनीलकुमार धुरडे ,उपाध्यक्ष शे, राजू, पवन हागे, गुरुदेव इसमोरे, गोपाल विरघट, आदींची उपस्थिती होती.