Saturday, September 21, 2024
Homeराज्यकर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव...

कर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव…

चंद्रपाल चौकसे यांचे नेतृत्वात कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

रामटेक – राजू कापसे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला असून त्याचा रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल दि. १३ मे ला दुपारी ५ वाजता दरम्यान गांधी चौक रामटेक येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आनंद उत्सव साजरा करताना पंचायत समिती रामटेकच्या माजी सभापती सौ. कलाताई ठाकरे, रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे युवा नेते श्री.पी.टी. रघुवंशी, माजी नगराध्यक्ष शोभाताई राऊत, शारदाताई बर्वे, चंद्रभान शिवरकर, नासिर शेख, आरिफ मालाधारी, अजय खेडगरकर, दुर्जन बर्वे, मोहन कोठेकर,

रामदास नागपुरे, सौ. विमलताई नागपुरे, शिवराम महाजन, अनिल बंधाटे, देवा डोंगरे, रवी बावनकुळे, सौ. अर्चनाताई बावनकुळे, लक्ष्मीकांत कोल्हे, रामानंद अडामे, नत्थूजी टिपले, नत्थूजी घरजाळे, अरुण मेंढे,

पंकज चौधरी, अजय मेहरकुळे, अनिल वाघमारे, जगदीश सांगोडे, रितेश बिरणवार व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: