राज्यातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देऊ शकते. २०२२ च्या राजकीय संकटाबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वतीने या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. आज 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील यावर शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी ट्वीट केले आहे.
उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी Live Low ला रीट्वीट करीत एकनाथ शिंदे गटातील आमदारांना डिवचत ट्वीट केले…अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्यांकडे असणार असल्याने राऊत यांनी काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ…जय महाराष्ट्र!
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी (MVA) आघाडी सरकारच्या पतनास कारणीभूत असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित याचिकांवर निर्णय घेणार आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचाही समावेश आहे.
संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण करून घटनापीठाने १६ मार्च २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि नऊ दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला.