जिल्हाध्यक्षांना पत्रक काढून करावी लागली मध्यस्थी
पातूर – निशांत गवई
वंचित बहुजन आघाडी पातूर तालुका कार्यकारिणी व सामन्य कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू असून आज सदर वाद अंतर्गत राहिला नसून सोशल मिडियाच्या माध्यमातून एका व्हाट्सएप ग्रुपवर चांगलाच पटल्याने चव्हाट्यावर आला असून तालुकभरात या व्हाट्सएप ग्रुपची चर्चा आहे.
पातूर तालुक्यातील वंचित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते तालुका अध्यक्षांवर नाराज असून बऱ्याच दिवसांपासून पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहेत.वंचितचे तालुकाध्यक्ष कार्यकारिणीतील एकदोन पदाधिकारी व त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याला घेऊन पक्षाचे निर्णय घेतात व जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्त्यांना विश्वासात नं घेत नाहीत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत तथा बाजार समितीच्या निवडणुकीत कोणालाही विश्वासात नं घेता स्वतःच्या दालनात बसून उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्ते नाराज तालुकाध्यक्ष यांचेवर नाराज आहेत.
तसेच युवा आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी मधून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्या सोयीच्या निकटवर्तीयांची युवा आघाडीच्या तालुका कार्यकारिणीत वर्णी लावली असल्याचा तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांचा आरोप असून वंचित बहुजन आघाडीच्या एका व्हाट्सएप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून वादविवाद सुरू होते,मात्र आज सदर ग्रुपवरील वाद एवढा पेटला की संपुर्ण दिवसभर तालुक्यात केवळ याच व्हाट्सएप ग्रुपची चर्चा सुरू होती.
सदर व्हाट्सएप ग्रुपवर वंचितचे तालुकाध्यक्ष डॉ.धर्माळ यांचे समर्थक व तालुक्यातील काही जुने निष्ठावंत व युवा कार्यकर्ते यांच्यात आरोप प्रत्यारोपावरून चर्चा रंगुन अंतर्गत वादंग उभे झाले.यावेळी तालुका अध्यक्षांना नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करता आली नसल्याकारणाने हा वाद एवढा विकोपास गेला की शेवटी वंचितच्या जिल्हाध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली.
यावेळी जिल्ह्याध्यक्षांनी एका पत्रकाद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना केल्या की, “आम्ही अकोला जिल्हा कमिटी जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे या पंचायत समिती पातूर ग्रुपमधील असणारे सर्व अॅडमिन तथा सभासद यांनी जे कोणी अशा प्रकारे डॉ. ओमप्रकाश धर्माळ यांना बदनाम करायचे काम ग्रुप वरून करत असेल त्याना तात्काळ ग्रुप अॅडमिननी ग्रुप वरून कमी करावे.
जर आपण ग्रुप वरून संबंधितांना कमी केले नाही तर आपणावर सुध्दा पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येईल तसेच ग्रुप वर जे कोणी जाणीवपूर्वक असे चुकीचे मेसेज टाकन तालुका अध्यक्षाची बदनामी किंवा पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी सुध्दा तत्काळ अशा प्रकारचे मेसेज टाकणे बंद करावे अन्यथा पक्षाच्या वतीने आपणावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच सर्व जिल्ह्यातील श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारे वंचित बहुजन आघाडी नावाने ग्रुप चालवणारे कार्यकर्ते तथा पदाधिकारी व सर्व अॅडमीन यांना सुध्दा या पत्राव्दारे सुचना देण्यात येत आहे. अशाच प्रकारचा जर आपल्या ग्रुपवर प्रकार जर आपल्या ग्रुपवर आढळला तर संबंधितांना ग्रुपमधून कमी करावे.
आणि जे कोणी जाणीवपूर्वक असे मेसेज टाकत असेल त्याची सर्व जाणीव पक्षश्रेष्ठी व जिल्हा कमिटीला असून या पुढे जर अशा प्रकारचे मेसेज टाकून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आपणावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.”
पातूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष/पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये व्हाट्सएप ग्रुपवर झालेला अंतर्गत वाद जिल्ह्याच्या नेत्यांनी पत्रक काढल्यामुळे तात्पुरता थांबला असला तरी सदर वाद चव्हाट्यावर आल्याने दिवसभर तालुक्यातील राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली असून राजकीय क्षेत्रातील बऱ्याच जणांकडून चांगले मनोरंजन झाले अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.