केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलाथिरम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी एक हाऊसबोट उलटली. या अपघातातील मृतांची संख्या 22 झाली आहे. बोटीत 40 जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री के. राजन यांनी बोटीतील प्रवाशांची नेमकी आकडेवारी असल्याचे स्पष्टपणे नाकारले. मुख्यमंत्रीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे. स्कूबा डायव्हिंग टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. यासोबत नौदलाची टीम आणि कोस्ट गार्डची टीमही पोहोचली आहे.
दरम्यान, बोटीतील लोकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक अग्निशमन अधिकारी शिजू केके यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत 22 मृतदेह बाहेर काढले आहेत. नावेत नेमके किती लोक होते हे आम्हाला माहीत नाही, त्यामुळे चिखलात आणखी किती लोक अडकले आहेत हे शोधण्यासाठी आम्ही शोध सुरू ठेवत आहोत.