मूर्तिजापूर :- दारव्हा येथून लग्न वऱ्हाड घेऊन परत येत असलेल्या उभ्या वाहनाला पाठीमागून ट्रक (चेचीस) धडक दिल्याने ४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी पहाटे तीन वाजताच्या हातगाव जामठी फाट्या दरम्यान घडली.
दारव्हा येथून एम एच २६ एके ००६२ या मॅक्सीमो गाडीने वऱ्हाड घेऊन येत असताना सदरचे वाहन जामठी (हातगाव) फाट्या दरम्यान बंद पडले,
यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक चेसीच क्रमांक जे एच ०५ ए ८४३८ (तात्पुरता क्रमांक ) ने बंद पडलेल्या वऱ्हाडी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत बंद वाहनातील नरेश दिवाकर जाधव (३२), कमला दिपक जाधव (५०), श्याम राजेंद्र गायकवाड (२२), निलेश गोरख वानखडे (२७) सर्व राहणार दाळंबी स्वज्वल सुधाकर जाधव (२१),
पियुष सुधाकर जाधव (२०), भोजराज नामदेव जाधव (५२), संगीता गजानन जाधव (४१), कुसूम सुधाकर जाधव (६५), माधुरी नामदेव गायकवाड (५२), सुभाष सदाशिव गायकवाड (६९), अरविंद भानुदास तायडे (२४) राहणार अमरावती, परतवाडा, वरुड हे जखमी झाले.
यापैकी ४ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच १२ जखमी अपघात ग्रस्तांना संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था हरीष पिंपळे द्वारा संचालित रुग्ण वाहीकेतून येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले पैकी ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.
यासंदर्भात ग्रामीण पोलीसांनी ट्रक चेसीच चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक हिंमत ठाकरे, हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे करीत आहेत.