सांगली – ज्योती मोरे.
“द केरळा स्टोरी” या चित्रपटास देशभरात विविध संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्शवभूमीवर, आज दि.६/५/२०२३ रोजी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने ऑरम सिनेमा, विजयनगर. येथे या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.
केरळ मध्ये लव्ह जिहाद च्या माध्यमातून हिंदू भगिंनीन वरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अत्याचार सिनेमाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून देशभरामध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून षडयंत्र मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात येत आहे, लाखो मुली या षडयंत्राला बळी पडून श्रद्धा वालकर सारखे हत्यकांड रोज कोठे ना कोठे घडत आहेत. म्हणून आपल्या भागामध्ये महिला व मुली यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी हा शो मोफत दाखविण्यात आला.यासाठी औरम सिनेमा चे व्यवस्थापक चिंतामणी कलगुटगी यांचे सहकार्य लाभले.
मिरज विभागाचे आमचे युवा सहकारी मा. कल्याण आंधळे ,पैलवान शुभम येवारे, गुरू शेगाव ,रोहित दंडवडे, गुंडा दंडवडे, सुशांत मळी, सुशांत घाटे, शुभम दंडवदे, विशाल क्षीरसगर ,जयदीप सदामते, संदीप माळी यांनी योग्य रित्या नियोजन केले.
या प्रसंगी, युवा सहकारी व माता भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच, हा चित्रपट संघटनेच्या माध्यमातून राज्यभर अनेक जिल्ह्यांमध्ये माता भगिंनिन साठी दाखविण्यात येणार आहे.