सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे
एस एम ग्लोबल कंपनीचे मालक मिलिंद गावडे यांच्याविरुद्ध फसवणुकीबाबत विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल फोरेक्स या शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात दीडपत रक्कम देण्याचे खोटं आमीष दाखवून एसएम ग्लोबल कंपनीचे मालक मिलिंद बाळासो गावडे राहणार सांगली वाडी तालुका मिरज यांनी निलेश विश्वासराव पाटील व 42 राहणार चिन्मय आश्रमा शेजारी गुलमोहर कॉलनी सांगली यांची 92 लाख 4517 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत पाटील यांनी गावडे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत अधिक माहिती अशी की मिलिंद गावडे यांनी पाटील यांना दहा महिन्यात रक्कम दीडपट करून देण्याचं आम्हीच दाखवून फॉरेक्स या शेअर मार्केट व्यवसायात एक कोटी 22 लाख 400 रुपये गुंतवण्यास सांगून त्या बदल्यात फक्त एकदाच परतावा म्हणून 22 लाख 34 हजार 633 रुपये दिले आहेत.
मात्र उर्वरित मुद्दल 77 लाख 87 हजार 767 रुपये आणि त्याचा फायदा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर दोघांचीही रक्कम मिळून 92 लाख 4 हजार 517 रुपयांची फसवणूक गावडे यांनी केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत असून, आरोपी हा पुण्यात असून लवकरच त्यास ताब्यात घेतले जाणार आहे.