Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीधक्कादायक...देवाच्या नगरीतच हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...१५ मुलींची पोलिसांनी केली सुटका...

धक्कादायक…देवाच्या नगरीतच हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…१५ मुलींची पोलिसांनी केली सुटका…

अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, शिर्डीतील ६ हॉटेलवर छापा टाकून देहव्यापार करणाऱ्या ११ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली असून या घटनेमुळे शिडीत मोठी खळबळ उडाली आहे

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत शिर्डीत काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक देहव्यापार चालतो अशी माहिती मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री आठ वाजले दरम्यान अतिशय बारकाईने सापळा रचून शिर्डीत अनैतिक अवैध व्यवसाय सुरू असणाऱ्या सहा हॉटेलवर छापा टाकून त्या ठिकाणी ११ पुरुषांना ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची सुटका केली.

शिर्डी पोलिसांनी सुरू केलेले या मोहिमेची बातमी सर्वत्र समजता अनेक हॉटेलवर अशा प्रकारे सुरू असलेल्या व्यवसाय धारकांचे धाबे दणाणले. अशा प्रकारचा व्यवसाय करत असणाऱ्यांनी ही बातमी समजतात त्यांनी आपले हॉटेल बंद केले. शिर्डीत एकाच वेळी अशा प्रकारच्या देहव्यापार करणाऱ्या हॉटेलवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संदीप मिटके यांनी अत्यंत हुशारीने शुक्रवारी रात्री शिर्डी शहरात ही मोहीम राबवल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. परंतु शिर्डी पोलीस मात्र या सुरू असलेल्या व्यवसायांकडे सपशेल दुर्लक्ष का करते या मागचे कोडे आहे. शिर्डी शहरात शुक्रवारी जवळपास सहा हॉटेलवर छापा टाकण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी अनैतिक अवैध व्यवसाय करणारे हॉटेल चालक व यात सामील असणाऱ्या इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: