Saturday, November 23, 2024
Homeराज्यअमरावती | क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यावर स्था. गु.शा. पथकाची धाड...

अमरावती | क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यावर स्था. गु.शा. पथकाची धाड…

१) प्रतिक किशोरसिंह ठाकुर, वय २६ वर्ष, रा. अचलपुर
२) संकेत शरद शेळके, वय २४ वर्ष, रा. परतवाडा
३) सिराज मेमन, रा. इतवारा बाजार, अमरावती (आरोपी क्रं. २ व ३ फरार)

अमरावती – सद्या सुरू असलेल्या इंडीयन प्रिमियर लिग (आय. पी. एल. ) क्रिकेटच्या सामान्यांवर पैश्यांची हार-जीतचा सट्टा अमरावती ग्रामिण जिल्हयात कोठेही खेळला किंवा खेळविला जाणार नाही याबाबत मा. श्री. अविनाश पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी आपले अधिनस्थ सर्व ठाणेदार व स्था.गु.शा. चे पथकास सुचना देवून आदेशित केलेले आहे.

बारगळ, स्था.गु.शा. चे पथक दि.३०/०४/२०२३ रोजी पो.स्टे. परतवाडा हद्दीत गस्त करित असतांना गुप्त माहीती मिळाली की, आरोपी नामे प्रतिक किशोरसिंह ठाकुर, वय २६ वर्ष, रा. परतवाडा हा त्यांचे अँन्ड्राईड मोबाईल क्रिकेट सट्टयाचे अॅप व आय. डी. लिंक व्दारे पैश्याचे हारजीतवर सट्टा खेळीत आहे.

प्राप्त माहीतीची शहानिश करून सदर आरोपीस स्था. गु.शा. चे पथकाने ताब्यात घेवुन तपासणी केली असता त्याचे मोबाईल मध्ये अॅप व आय.डी. लिंक व्दारे तो क्रिकेट सट्टा खेळीत असतांना मिळुन आला.

सदर आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने सदर अॅप व आय.डी. लिंक ही त्याला फरार आरोपी नामे संकेत शरद शेळके, वय २४ वर्ष, रा. परतवाडा व सिराज मेमन, रा. इतवारा बाजार, अमरावती यांनी उपलब्ध करून देली असुन त्यांचे सांगण्याप्रमाणे तो सट्टा चालवित असल्याचे सांगीतले.

त्याचप्रमाणे सदर सट्टयाचा संपुर्ण हीशोब हा मुख्य सट्टा बुकी आरोपी क्रं. ३ सिराज मेमन, रा. इतवारा बाजार, अमरावती याला देण्यात येत असल्याचे सांगीतले सदर आरोपी कडुन सट्टयासाठी वापरण्यात येणारा मोबाईल व नगदी असा एकुण ११,६००/- माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहेत.

सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात श्री. तपन कोल्हे.पो. नि., स्था. गु.शा., अमरावती ग्रा. यांचे नेतृत्वातील स.पो.नि. रामेश्वर धोंडगे पोलीस अमंलदार युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, रविन्द्र व-हाडे यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: