सांगली – ज्योती मोरे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या संकल्पनेतून जायंटस वेलफेअर फाउंडेशन सांगली सहेली आणि पोलीस कल्याण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी, महिला अंमलदार, महिला लिपिक वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात महिलांविषयक आजारांच्या तपासण्या, हाडांच्या तपासण्यासह इतर तपासण्या करण्यात येऊन मोफत औषध उपचार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर उमेश भोई यांनी त्वचा विकारावर आणि सौंदर्य विषयक साधनांचा योग्य वापर करून त्वचेची निगा कशी राखावी? याबाबत मार्गदर्शन केले.
सदर शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जायंटस ग्रुपच्या अध्यक्ष डॉक्टर आशा गाजी यांच्यासह इतर पंधरा प्रसिद्ध डॉक्टर, नर्सिंग स्टाफ याचबरोबर वेगवेगळ्या प्रसिद्ध औषध कंपन्यांचे वीस प्रतिनिधी उपस्थित होते.
सदरचे शिबिर पोलीस उपअधीक्षक सुरक्षा सुरेखा दुग्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले, पोलीस उपनिरीक्षक काझी तसंच पोलीस कल्याण विभागाकडील अंमलदार पवार, जमदाडे, हिप्परकर, मोहिते, महिला पोलिस अंमलदार कुकडे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. सदर शिबिराचा 120 महिला पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीयांनी लाभ घेतला.