सांगली – ज्योती मोरे.
सांगली मधील संजयनगर परिसरात गुंड नगरसेवकाने दहशत निर्माण केली आहे. नशेखोर युवक, गुंडांच्या कडुन नागरिकांना मारहाण केली जाते. शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले जात आहे. वाटमारी केली जात आहे. महिलांची छेडछाड केली जात आहे. संजयनगर पोलिसांची याला मूकसंमती आहे. पोलीस दखल घेत नाहीत. या विरोधात लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी दिली.
ते म्हणाले, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजप प्रणित पॅनेलचा प्रचार का केला म्हणून गुंड नगरसेवक मनोज सरगर आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना शिवीगाळ केली. कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत संजयनगर पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी लक्ष दिले नाही. फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी कानउघडणी केल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक सरगर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतू सरगर व त्याच्या टोळीने संजय नगर परिसरात दहशत निर्माण केली आहे. नशेखोर युवक, गुंडांच्या कडुन नागरिकांना मारहाण केली जाते. शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले जात आहे.
वाटमारी केली जात आहे. महिलांची छेडछाड केली जात आहे. संजयनगर पोलिसांची याला मूकसंमती असल्याचा आरोप करत माने म्हणाले, संजयनगर पोलीस व नगरसेवक सरगर यांच्या संगणमताने परिसरात दहशत निर्माण केली जात आहे. या विरोधात लवकरच नागरिकांसह मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा माने यांनी दिला आहे.