नागपूर – शरद नागदेवे
नागपूर – ग्रामजयंतीची राष्ट्रसंतांची संकल्पना मांडताना- व्यक्तिपूजा मान्य नसलेल्या राष्ट्रसंतानी त्यांची जयंती साजरी करण्याला विरोध करून ग्रामजयंतीची संकल्पना मांडली.गावातील माणूस आणि गावे हा सदैव राष्ट्रसंतांच्या चिंतनाचा विषय राहिला आहे.. गावातील जनता सुखी व्हावी, गावे स्वयंपूर्ण ,स्वावलंबी असावी हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. त्यासाठी ग्रामगीता लिहिली.
तुकडोजी महाराज खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते, संत आणि राष्ट्रसंत विशद करतांना संत कोणाला म्हणावे ह्या राष्ट्रसंतांच्या संकल्पनेला डॉ .संजय भक्ते यांनी उजाळा दिला.. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र नागपूरच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात डॉक्टर संजय भक्ते यांनी ग्रामजयंती, ग्रामगीता निर्मिती आणि तुकडोजी महारांजाच्या जीवनदर्शनाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.. डॉ.मंजुषा सावरकर यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रसंतांच्या ग्रामजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्राचे उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांनी राष्ट्रसंतांचा मानवतावादी दृष्टिकोन काळाची गरज असून गावागावापर्यंत राष्ट्रसंतांचे विचार ,सामुदायिक प्रार्थना येणाऱ्या पिढीच्या माध्यमातून निरंतर सुरू राहायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गुलाबराव ऊके,अभय महांकाल,निलेश खांडेकर,रवि देशमुख,राजू राउत,संदेश सिंघलकर,आनंद महले,राजू लांडे,अतुल कटरे, पुरुषोत्तम गोतमारे आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन अनिल इंदाने यांनी तर,आभार प्रदर्शन डॉ.कोमल ठाकरे यानी मानले .