मुंबई – भिवंडी परिसरात आज शनिवारी दुपारी तीन मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले आहे.
ही घटना भिवंडीतील वालपाडा भागातील असल्याची माहिती आहे. स्थानिक लोकांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून अपघाताची माहिती दिली. सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, कैलासनगर (वलपाडा) येथील वर्धमान कंपाऊंडमधील जी-2 इमारत दुपारी 12 वाजता कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुमारे तीन ते चार कुटुंबे राहतात. खालच्या मजल्यावर कामगार काम करत होते. हे सर्व लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अग्निशमन दल, एनडीआरएफच्या तुकडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
बातमी आताच ब्रेक झाली थोड्यावेळात Update होत आहे…