अकोला – अमोल साबळे
अवकाळी पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुढाल पाच दिवस अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे. हवामान विभागानं या संदर्भात अंदाज जाहीर केले आहेत. २ मे पर्यंत अवकाळी पावसाचं संकट हवामान विभागाकडून अलर्ट जारी विदर्भ मराठवाड्यात पाऊस महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार मराठावाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. २८ एप्रिल रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड सह अहमदनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२९ फेब्रुवारीला अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.