महेंद्र गायकवाड
नांदेड
हिमालयातील श्री केदारपीठाचे जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी श्रावणमास अनुष्ठाणाची सांगता रविवार दि.28 ऑगस्ट रोजी सिडको गोपाळचावडी येथील दशमुख आश्रमात होणार आहे.
श्री केदार जगद्गुरु हे विरशैव पंथातील पाच जगद्गुरुंपैकी एक आहेत. यांचा संपूर्ण देशभर शिष्यवर्ग आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणी अनुष्ठाण करतात. यापूर्वी त्यांनी बाराज्योर्तिलिंगासह अनेक ठिकाणी श्रावणमास अनुष्ठाण केले आहे. त्यांचे गोपाळचावडी येथील श्री दशमुख आश्रमातील हे 50वे अनुष्ठाण आहे.
दि.29 जुलैपासून श्री गुरु दशमुख आश्रमात सुरु झालेल्या या श्रावणमास अनुष्ठाणाची सांगता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या दिवशी सकाळी 8 ते 12 या वेळात संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा, दुपारी 12 ते 2 धर्मसभा व त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रावणमास अनुष्ठाण संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.