राजु कापसे
रामटेक
23 ऑगस्टला स्थानिय कविकुलगुरू इंस्टिटयूट ऑफ टेक्नालाजी अॅण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये कोरोना बुस्टर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन तहसिलदार बाळासाहेब मस्के यांचे हस्ते झाले.
यावेळी प्रामुख्याने किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, मनसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रविण चामट, डॉ. मंगेश रामटेके, आरोग्य सहायक प्रदीप खंते, धर्मराज उइके, रजिस्ट्रार पराग पोकळे, डीन स्टुडन्ट ऍक्टिव्हिटी डॉ. पंकज आष्टणकर, सहित प्राध्यापक व विद्यार्थि उपस्थित होते. शिबिरात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहित 300 लोकांनी बुस्टर डोज घेतला.
तहसिलदार बाळासाहेब मस्के म्हणाले की सर्वांना बुस्टर डोज घेणे महत्वाचे आहे. बुस्टर डोज घेतल्याने कोरोनाला दूर ठेवता येईल. ते म्हणाले स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव निमित्य केंद्र सरकार कडून 30 स्पटेंबर पर्यंत 18 वर्षाचा वर लोकांना निशुल्क बुस्टर डोज दिल्या जात आहे यांचा उपयोग घ्यावा. डॉ. अविनाश श्रीखंडे व डॉ. चेतन नाईकवार यानी सुद्धा मार्गदर्शन केले. लसीकरणाचे काम परिचारीका पायल धात्रक व प्रगती बद्रे यांनी केले.