Saturday, November 23, 2024
Homeराज्यन्याय व हक्कासाठी लघु व सुक्ष्म उद्योजकांचे गोकुळ शिरगाव एम आय डी...

न्याय व हक्कासाठी लघु व सुक्ष्म उद्योजकांचे गोकुळ शिरगाव एम आय डी सी त आंदोलन…

विविध मागण्यासाठी शासनाचे व मोठ्या उद्योजकांचे लक्ष्य वेधले:मोर्चात साडेतीनशे लघु उद्योजक व कामगाराचा सहभाग…

गोकुळ शिरगाव: प्रतिनिधी -राजेद्र ढाले

न्याय व हक्कासाठी इंजिनीअरिंग कॉम्पोनन्ट्स मशीनिंग ओनर्स वेलफेअर (ECMOW)असोसिएशन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील लघु व सुक्ष्म उद्योजकांनी गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी परिसरात विविध मागण्यासाठी काम बंद ठेऊन आंदोलन केले.या वेळी भव्य मोटर सायकल रॅली काढून मोठ्या उद्योजकांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लघू उद्योजक व कामगार यांनी काढलेला  कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा असल्यानं विविध मागण्याची पूर्तता होण्यासाठी उद्योजकांनी विवीध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

येथे झालेल्या आंदोलनात लघु व सुक्ष्म उद्योजकांनी विविध मागण्याच्या माध्यमातून मोठ्या उद्योजकांचे व महाराष्ट्र शासनाचे लक्ष्य वेधले आहे.यामध्ये खालील मागण्याची पूर्तता करण्यासाठी लघु उद्योजक एकवटले होते.बोरिंग रिटर्न पॉलिसी बंद झाली पाहिजे.दर वर्षी महागाई प्रमाणे मशिनिंग दर वाढले पाहिजे.मशीनचे तासी दर योग्य मिळालेच पाहिजेत्.कामचे बिल ४५ दिवसात जी एस टी नियमानुसार वेळेत मिळाले पाहिजे.लघु उद्योजकांचे शोषण बंद झाले पाहिजे.बेकादेशीर डेबिट नोट बंद झाली पाहिजे.लहान उद्योजकांना न्याय मिळाला पाहिजे.अश्या या वेळी मागण्या करण्यात आल्या. या मागणीचे निवेदन गोशिमा कार्यालय, उद्योग मंत्री, उद्योजक कार्यालय व  मार्व्हलस इंजिनीअरिंग ग्रुप, व इतर मोठे कारखानदार यांना देण्यात आले आहे. या वेळी लघु उद्योजक यानी विविध घोषणा देउन परिसर दणाणून सोडला होता. सकाळीं दहा वाजता सुरु झालेला हा मोर्चा दुपारी तीन वाजेपर्यंत भर उन्हात त  सरूच होता.

यावेळी अध्यक्ष राजीव  आवटे, उपाध्यक्ष विजय दाभाडे, सेक्रेटरी नयन गारगोटे, खाजानिस सतीश पाटील, संचालक मोहन शेटे, संदिप कदम, संतोष वठारे, अमितकुमार पाटील, विजय शिंदे, लघु उद्योजक गणेश पवार, रवी ढोकरे , नवनाथ पाटील, कृष्णात चव्हाण, मयूर जगताप, अभिजित नरके, कामगार प्रतिनिधी उदय खराडे, बाळासो पाटील यांच्या सह साडेतीनशे लघु व सुक्ष्म उदोजक, कामगार आंदोलनात काम बंद ठेऊन सहभागी झाले होते. यावेळही कामगारांनी इंजिनीअरिंग कॉम्पोनन्ट्स मशीनिंग ओनर्स वेलफेअर (ECMOW)असोसिएशन, कोल्हापूरचे या संस्थेकडून मिळालेल्या कामाच्या मोबदल्या बद्दल आनंद व्यक्त केला.

येथील एका लघु उद्योजक कंपनी उद्योजकांची एका मोठ्या कंपनीने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. यांची चर्चा आंदोलन स्थळी उमटत होती.

चौकट: स्टार्ट अप किंवा मेक इन इंडिया या सारख्या पॉलिसीचा कोणताच फायदा झाला नाही. बँका कर्ज ही देत नाहीत. अर्ज विंनत्या करून, हेलपाटे मारावे लागतात. तरीही मुद्रा लोन किंवा अन्य योजनेतून कर्ज मिळालं नाही.

गणेश पवार लघू उद्योजक
शासनाच्या नियमानुसार मोठ्या उद्योजकांकडून जी एस टी नियमानुसार ४५ दिवसामध्ये कामाचे बील मिळालं पाहिजे. जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील लघु उद्योजक सर्व सामान्य कामगारांची भूक भागविण्याचे काम करत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे पुण्याईचे काम होत आहे. जवळ जवळ ३०हजार कामगारांना न्याय देण्याचे काम होत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: