पुणे जिल्ह्यातील चाकण जवळ एक ह्रदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. ज्या महिले सोबत त्याचे अनैतिक संबध होते तिच्याच 15 महिन्यांच्या निष्पाप मुलाला उकळत्या पाण्यात फेकले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. महिलेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने नाराज होऊन त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील शेत पिंपळगाव गावातील घटना आहे. पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, की, ६ एप्रिल रोजी महिला घरी नसताना त्या व्यक्तीने मुलाला उकळत्या पाण्याच्या बादलीत टाकले. गरम पाण्याने बालक गंभीररित्या भाजले आणि उपचारादरम्यान १८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.
आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मुलाची आई त्याच्याशी लग्न करण्यास तयार नसल्याने त्याने त्याचा राग मुलावर काढला. महिला घरी नसताना आरोपीने मुलाला उकळत्या पाण्याच्या बादलीत टाकले. त्यानंतर मुल चुकून बादलीत पडले, असा कांगावा केला. परंतु महिलेच्या बहिणीने आरोपीला मुलाला गरम पाण्याच्या बादलीत टाकताना पाहिले होते. आरोपीने तिला गप्प बैस अन्यथा तुलाही मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या बहिणीने हकीकत सांगितली. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.
या व्यक्तीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिनगारे यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, ती व्यक्ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार नसल्याने तो तिच्यावर रागावला होता. त्यामुळे त्याने मुलाची हत्या केली.