जेव्हा पासून सोशल मिडिया अस्तिवात आला तेव्हा पासून जगातल्या कोणत्याही कान्याकोपऱ्यातील Video आपण सहज पाहू शकतो. तर बरेच Video धाडसी रेस्क्यू ऑपरेशनचे असतात. असाच एक धोकादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेत कारच्या इंजिनमध्ये अडकलेल्या एका छोट्या कुत्र्याचा जीव संकटात सापडला होता, पण काही लोकांनी आपल्या हुशारीने आणि तयारीने त्याला सुखरूप बाहेर काढले. सोशल मीडियावर या कुत्र्याच्या बचावाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमेरिकेत कारच्या इंजिनच्या मध्यभागी अडकला, या कुत्र्याने 30 मैलांचा प्रवासही पार केला. नेमका हा कुत्रा इंजिनमध्ये कसा अडकला? कारचे बॉनेट उघड असेल तेव्हा हा कदाचीत चढलं असावा. पण त्याला बाहेर निघण्याचा मार्ग सापडला नाही. गाडीच्या ड्रायव्हरला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती आणि याच अवस्थेत त्याने कॅन्सस ते मिसूरी असा सुमारे 30 मैलांचा प्रवासही पूर्ण केला. न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, कॅन्सस सिटी रॉयल्सचे डिजिटल रिपोर्टर आणि होस्ट केरी गिलास्पी यांनी कुत्रा पाहिला होता. गाडीतून येणारा आवाज ऐकून त्यांनी तपासणी केली असता इंजिनमध्ये कुत्रा अडकल्याचे दिसले.
यानंतर कारचे मालक एशले न्यूमन यांना पार्किंगमध्ये बोलावण्यात आले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर कुत्र्याला बाहेर काढण्यात आले. कुत्र्याला पाणी पाजून आवश्यक उपचार दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या बोनबोन नावाच्या या कुत्र्याला कॅन्सस सिटी पेट प्रोजेक्टमध्ये नेण्यात आले आहे. (माहिती Input च्या आधारे)