अमोल साबळे
दिनांक : 24-Aug-22
अकोला : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या २६ जिल्ह्यांतील तब्बल १८ लाख २१ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यानुसार २२ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून त्यांना भरपाईपोटी अंदाजित बावीसशे ते अडीच हजार कोटींची भरपाई मिळेल. त्याचा अहवाल कृषी विभागाने सरकारला सादर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.