गुन्हे शाखेच्या पथकाने 2 अल्पवयीन पीडित मुलींची 2 महिला दलालांच्या तावडीतून वेश्या व्यवसायातून सुटका केली!
ठाणे – एएचटीसी ठाणे सिटी टीमला ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ता बिनू वर्गीस यांच्याकडून माहिती मिळाली होती की, कल्याण पश्चिमेच्या एमएफसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, कल्याण रेल्वे स्टेशनजवळ, अनिल पॅलेस हॉटेलजवळ, 2 महिला दलालांनी एका अल्पवयीन मुलीच्या वर्जिनिटीचा सौदा 1.5 लाख रुपयात करण्यासाठी येणार होती.
ठाणे एएचटीसीचे वरिष्ठ पीआय महेश पाटील यांनी वरील माहितीच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने अनिल पॅलेस लॉजिंग बोर्डिंगजवळ छापा टाकून दोन महिला दलालांना ताब्यात घेतले आणि 2 अल्पवयीन मुलांना (17 वर्षे व 17 वर्षे) या दोन महिलांच्या तावडीतून सुटका केली.
महिला एजंट अल्पवयीन पीडित मुलीचा वर्जिनिटीचा सौदा 1.50 लाखात करण्यासाठी ग्राहक शोधत होती, ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आला, गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 2 महिला दलालांना ताब्यात घेतले आणि 2 अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली. अंजू आणि सरिता असे आरोपींचे नावे असून अंजू ही कल्याण स्टेशनच्या जवळ असलेल्या नीलम ऑर्केस्ट्रा येथे वेटर म्हणून काम करते.
ठाणे गुन्हे शाखेचे पथक दोन महिला दलालांवर PITA + POCSO कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करत असून 2 अल्पवयीन पीडित मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया, AHTC (गुन्हे शाखा) ठाणे शहर पथक करत आहे! 366(A),370,(A), 370(3),372,34 IPC R/W 3,4,5 ITPA ActR/W 16,17,18 POSCO Act R/W81, 87 J.J.Act.