दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी मंगरुळनाथ येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून शांततेत उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांची मागणी मा.जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून नगरपरिषद इमारतीवरील उर्दू नाव काढून टाकले मात्र काही समाजकंटकांनी कायदा हातात घेऊन ते पाण्याने धुऊन टाकले व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
अशा समाज कंटक वर सरकारी कामात अड्थड़ा निर्माण केला परंतु मुख्याधिकारी यांनी अशा प्रकारची कोणतीही तक्रार दिली नाही तरी अशा दोषी अधिकारी व समाज कंटक यांचेवर कार्यवाही करावी तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुण कायदा हातात घेऊन गुंडशाहीचे प्रदर्शन करणाऱ्या समाजकंटकांवर व मुख्याधिकारी /थानेदार यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा बजरंग दल संपुर्ण विदर्भ प्रांतात लोकशाही मार्गाने आंदोलन करेल.
अशी मागणी विहिंप बजरंग दल खामगाव कडून करण्यात आली यावेळी विहिंप जिल्हाध्यक्ष राजेश झापर्डे, जिल्हा मंत्री राजेंद्रसिह राजपूत,बजरंग दल जिल्हा सह संयोजक निलेश बरडीया, नगर संयोजक पवन माळवंदे,निलेशसिह(गोलू) ठाकूर,मेदनकर सर,भिकाजी रेठेकर,श्याम तोडेकर,सागर खिरडकर,ज्ञानेश्वर शेगोकर यांची उपस्थिती होती.