बाबा साहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संवैधानिक स्वरूपाने प्रत्तेकाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. प्रत्येक माणसाला उंच मान करून समाजात जगण्याचा अधिकार दिला. परंतु मला स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची संयोजिका या नात्याने असे वाटते की, माझे हे प्रामाणिकपणे मत आहे, कोणीही तुम्हाला आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम करून शकत नाही. आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी मात्र स्वताला स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात.
बाबासाहेबांनी आपल्याला इतर स्वातंत्र्य दिल असल तरी आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वतः झटाव लागत. आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने समाजाचा खरा विकास होईल. बाबासाहेबांच स्पष्ट मत होत की, कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती जर तुम्हाला आखायची असेल तर, तुम्ही त्यांच्या महिलांच्या शिक्षण व प्रगतीवरून आखू शकता.
आणि आज शिक्षणाचा अधिकार संविधानाने बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाला, परंतु आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम होण्यासाठी मात्र आपल्याला स्वतः प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान गेल्या पाच वर्षापासून मा. श्री किरण पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात सातत्याने काम करीत आहे. आणि याचीच पोचपावती मला आज या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलाविल त्यारूपणे मिळाली आहे.
मला एवढच स्पष्ट सांगायच आहे की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आपल्यासाठी मदतीला उभ आहे. खऱ्या अर्थाने खूप साऱ्या सबसीडीच्या योजना आहेत. जवळपास ६०% हून अधिक सबसीडीच्या योजनांचा फायदा घेऊन सगळ्यांनी आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम झाले पाहिजे असे मला वाटते. महापुरुषांच्या पुण्यातीथ्या, जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करून समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही.
“ बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, बाबासाहेबांना डोक्यात घेतल पाहिजे ” असं माझ प्रामाणिक मत आहे. बाबासाहेबांची जयंती केवळ डी.जे. लाऊन, डान्स करून, किंवा जेवण आथवा आनंदोत्सवपुरती मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थाने बाबासाबांना आपण त्याच दिवशी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देऊ शकतो किंवा आदरांजली वाहू शकतो जेव्हा, तळागळातील शेवटचा घटक आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम होईल.
स्वतःच अस्तित्व बनवू शकेल. आणि स्वाभिमानाने या समाजात तो जगू शकेल. आणि त्यासाठीच आम्ही तुमच्या मदतीला उभे आहोत. कधीही कोणालाही मदत लागली तर, त्यांनी आम्हाला मदत मागावी असे जाहीर आव्हाहन करते. ज्यांना पण आर्थिक दृष्टीकोनातून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी जर व्यवसाय सुरु कारायचा असेल तर त्यांनी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान ची मदत मागावी.
अभियान तुमच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहील. अभियानाची संयोजिका या नात्याने मी आणि अभियानाचे अध्यक्ष मा. श्री किरण पातुरकर यांना कधीही तुम्ही संपर्क करू शकतात. मी संपर्क नंबर खाली देते आहे. कार्यक्रमाला उस्थित सगळ्या प्रमुख पाहुण्यांचे धारवाडे साहेब, इंगोले साहेब, प्रफुल्ल गवई, रविकांत गवई, ओमप्रकाश बनसोड यांचे मी आभार मानते.
धन्यवाद !!!
प्रा. मोनिका उमक
संयोजिका – स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान