आलापल्ली – देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र जी मोदी यांनी तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत योजना राबवुन त्या कार्यान्वित करण्याचं काम केल.त्याचाच एक भाग म्हणून व्यापाऱ्यांसाठी मुद्रा लोन अमलांत आणली. व आलापल्लीच्या व्यापाऱ्यांनी यांचा लाभ घेत त्याच धर्तीवर व्यापारी संघटनेने केंद्राचा प्रतिनिधित्व करणारे खा.अशोक नेते यांचा आल्लापल्ली येथे व्यापारी संघटनेने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी आलापल्ली परिसरात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी खा.नेते यांना व्यापारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. आल्लापल्ली येथील मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात येतील,रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक्स लावून सुशोभिकरण, सोबत व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यावर प्राधान्य देऊ असे खा.नेते व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत म्हणाले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश जी गेडाम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे ,उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार,सचिव अमित पेम्पकवार,पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड ,आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, गंगाधर रंगू,हुसेन खान पठाण ,विनोद अक्कनपल्लीवार,रमेश गोटमवार आदींची उपस्थिती होती.