अकोला – अमोल साबळे
राज्यभरात सध्या बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, बाजारभावात चढ-उतार दिसून येत आहे. गत तीन-चार दिवसांपासून बाजारात तुरीला चमक तर पांढरे सोने चकाकल्याचे दिसून येत आहे. तूर व कापूस जिल्ह्यातील बाजारपेठेत नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठण्याची शक्यता असून, सध्या तूर ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल, तर कापूस ८ हजार ८४० रुपये क्विंटल विक्री झाला आहे. गत आठ दिवसांत कापसाच्या दरात ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्या भरापासून धान्याची आवक वाढली आहे. बाजारात शनिवार, दि. ८ एप्रिल रोजी तुरीला ८ हजार ७०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे तर
मे महिन्यात आणखी वाढणार दर?
यंदा मध्य प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना बदलत्या वातावरणाचा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक भागांत शेंगा पोखरणाच्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नात घट झाली आहे. तेच आंतराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या भावात हालचाली वाढल्याने कापूस व तुरीचे दर मे महिन्यात आणखी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
मार्च महिन्याच्या अखेर तुरीला ८ हजार ९६५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. परंतु त्यानंतर एप्रिल महिन्यात तुरीचे दर खाली आले. मात्र आता पुन्हा दर वधारल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नसून, केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मात्र भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील पांढया सोन्याची पंढरी असलेल्या अकोट बाजारपेठेत कापसाला ८ हजार ८४० रुपये प्रति.