Saturday, September 21, 2024
Homeराजकीयभाजप स्वच्छ प्रतिमा आणि चांगल्या विचारसरणीचा पक्ष - आमदार सुधीर गाडगीळ...

भाजप स्वच्छ प्रतिमा आणि चांगल्या विचारसरणीचा पक्ष – आमदार सुधीर गाडगीळ…

सांगली — ज्योती मोरे.

प्रथम राष्ट्र आणि नंतर पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे. स्वच्छ प्रतिमा आणि चांगल्या विचारसरणीचा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम भ्रष्टाचार मुक्त सरकार देशाला लाभले आहे. देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

आमदार गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता,स्व.श्यामाप्रसाद मुखर्जी,स्व.पंडित दीनदयाल उपाध्ये,स्व.वाजपेयीजी यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. आमदार गाडगीळ म्हणाले, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष या संकल्पनेतून देशातील राजकारणात एक स्वच्छ प्रतिमेच्या चांगल्या विचारसरणीच्या राजकीय पक्षाची गरज होती. म्हणून १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय,अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली.

कालांतराने याच पक्षाचे भारतीय जनता पार्टीमध्ये नामकरण झाले.आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एक स्थिर, भक्कम,भ्रष्टाचार मुक्त सरकार या देशाला लाभले असून. मोदीजींच्या सबका साथ सबका विकास या विचारावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले,भारतीय जनता पार्टी हा या देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. १५ कोटी सदस्य असणारा देशाच्या राजकारणातील हा एकमेव पक्ष आहे.देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे ३०३ खासदार,१३०० हून अधिक आमदार तसेच १६ राज्यात भाजपा व मित्र पक्षाचे सरकार सत्तेत आहे.

भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार, श्रीकांत शिंदे, मुन्ना कुरणे यांनी मार्गदर्शन केले. अविनाश मोहिते यांनी आभार मानले. संघटन मंत्री दीपक माने, गटनेत्या भारती दिगडे, नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेवक,विनायक सिंहासने, सौ. तारळेकर, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष शहानवाज सौदागर, प्रियानंद कांबळे, उदय मुळे, रविंद्र ढगे, आनंदराव पवार, गौस पठाण, दरिबा बंडगर, राजू मद्रासी, अतुल तळेकर, राजेंद्र कार्लेकर, नितीन पटवर्धन, विकास आवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: