Friday, November 22, 2024
Homeराज्यखारघर हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा...

खारघर हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा संपन्न…

किरण बाथम
पनवेल /रायगड

खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा ढोल ताशांच्या गजरात आणि वेदमंत्र, हरी नामाच्या जय घोषात समस्त हाईड पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला.

सकाळी ११ ब्राम्हण आणि ५ यजमान यांच्या उपस्थिती मध्ये पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले. आणि त्या नंतर कळस यात्रा काढण्यात आली. अग्रक्रमी ढोल-ताशा नंतर कळस पालखी, पारंपारिक वेशभूषेतील रहिवाशी, भजन मंडळी, देवदेवतांच्या वेषातील बच्चे कंपनीचा चित्ररथ, महिलांच्या फुगडी, असा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक दणकेबाज कार्यक्रम होता.आल्हाददायक वातावरण आणी सर्वच रहिवाशीयांच्या जल्लोषपूर्ण सहभागाने कळस यात्रा संपन्न झाली.

कळस रोहणा नंतर सोसायटीने नागरिकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जवळ जवळ १५०० नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. हाईड पार्क मधील कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतदादा रामशेठ ठाकूर यांनी सोहळ्यास उपस्थिती दर्शवून सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच विविध प्रभगाचे विद्यमान व माजी नगरसेवक देखील सोहळ्यास उपस्थीत राहिले.

या सोहळ्यास खारघर मधील विविध मठ-मंदीर प्रमुख तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद, विश्वमांगल्य सभा, भारत रक्षा मंच अशा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते. सोसायटीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देवुन सन्मान केला. तसेच कार्यक्रमात सर्व रहिवाशांचे प्रेम आणि सदर कार्यक्रमात सहभागी असणारे कार्यकर्ते यांचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचे नियोजन आणि मेहनत दिसुन आली आणि कळस रोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: