सांगली – ज्योती मोरे
नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे राजपत्रित वर्ग 2 चे अधिकारी असतानाही त्यांना दिली जाणारी वेतन श्रेणी ही वर्ग3 प्रमाणे दिली जाते. त्यामुळे ती सुधारित करून वर्ग 2 प्रमाणे देण्यात यावी,या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली.