काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज रोजी सुरतला जाणार असून ते मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. तर आपल्या नेत्याला समर्थन देण्यासाठी देशातून कॉंग्रेस नेते हजेरी लावणार आहेत. तर अमरावतीच्या माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर हे सुद्धा सुरतला निघाल्या होत्या मात्र गुजरात हद्दीत दाखल होताच तेथील पोलिसांनी यशोमती ठाकूर यांचा ताफा अडविला आहे. यशोमती ठाकूर यांनी Twitter च्या माध्यमांतून Video शेयर करीत गुजरात पोलिसांना चांगलाच सुनावलं…
ॲड.यशोमती ठाकूर यांनी ट्वीट लिहले…राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरात ला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरत ला रवाना झाले होते त्यावेळी अशीच चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला…
सुरत ला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलीसांनी अडवली. त्यावेळी पोलीसांनी लाइव्ह स्ट्रीमींग कॅमेराधारक दोन कर्मचारी यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचं थेट लाइव्ह गांधी नगर मध्ये होतंय, तिथे तुम्हाला बघतायत असं पोलिसांनी सांगीतलं.
आमचा नेता गुजरात ला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीस जाऊ दिले. मात्र, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गाडी रोखण्यात आली.
देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर ही बाब गंभीर आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली आणि आज काँग्रेसच्या आमदारांना रोकटोक केली जात आहे, याचा निषेध ही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.