छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या सरपंचाने फुलंब्री पंचायत समितीसमोर गळ्यात २ लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून आणि त्या नोटांची समितीच्या आवारातच उधळण सुरु केली. नोटा उधळत असताना त्याने पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात…अशी संतप्त भावना व्यक्त करत अनोखे आंदोलन केले. जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील हे अपक्ष सरपंच असून त्यांचे नाव मंगेश साबळे आहे.
शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. सरकार या अधिकाऱ्यांना दीड दीड लाख रुपये पगार देत असूनही यांना विहिरी मंजूर करून घेण्यासाठी गरीब शेतकऱ्याचे पैसे लागतात, असा आरोप या सरपंचाने केलाय. अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आज २ लाख रुपये उधळतोय, हे पैसे घ्या आणि विहिरी द्या. अजूनही नाही काम झालं तर शेतकऱ्यांकडून आणखी पैसे आणतो, तुम्हाला देतो पण शेतकऱ्यांना विहिरी द्या, अशी व्यथा मांडणारं आंदोलन या सरपंचाने केलंय.
कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी या सरपंचाचा Video ट्वीट म्हणाले…महाराष्ट्रातील तरुण सरपंचाचे अनोखे आंदोलन. एका सरकारी अधिकाऱ्याने त्याच्या गावात विहीर खोदण्यासाठी लाच मागितली. अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर त्यांनी दोन लाख रुपये उडवले. अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास एसपी कार्यालयासमोर नग्न अवस्थेत आंदोलन करणार आहे….