Gold Price Today : सध्या देशात सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव वाढण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सोने किंवा चांदी (Gold-Silver Price) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरात आज सोन्या-चांदीचा दर कोणत्या भावाने उपलब्ध आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 380 रुपयांनी म्हणजेच 0.64 टक्क्यांनी वाढून 59,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी, आज चांदीचा भाव स्थिर असून, आज त्याची किंमत 71,400 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.
देशातील महानगरांमध्ये आज सोन्याचा दर
दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,285 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 47,927 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकात्यात 24 कॅरेट सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या खरेदीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजकाल चेन ते अंगठी असे सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात. त्यामुळे त्याची मागणी वाढते.त्याचवेळी मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होत असते. त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतार यापुढेही कायम राहतील, असा अंदाज आहे.