नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील मोवाड येथे चंडिका माता देवस्थान जुनी वस्ती येथे चैत्र मासाच्या पावन पर्वावर सुदामकृष्ण शास्त्री महाराज वृंदावन)उत्तरप्रदेश यांचे संगीतमय शिमहापुराण आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वा. जुनी वस्ती येथून भव्य शोभयात्रा काढण्यात आली. दि २२/३/२०२३ पासून ते २९/३/२३ सात दिवसाचे संगीतमय शिवमहापुराण आयोजित केले होते .सायंकाळी ४ते ७ वाजे पर्यंत शिव कथावाचन शिव तांडव , सकाळी १०ते २ वाजे पर्यंत आरती, भजन सम्पन्न झाले.
शिवपुरानात ज्ञान, वाचन , विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले. शिव पुराण ऐक न्या करिता उमरी ,हीवरा, पंढरी, बेलोना ,, मोवाड, खैरगांव, येरला, इंदौरा, मानीक वाड़ा, गोधनी अशा बाहेर गांवच्या जन ते नी हजारो च्या संख्यानी उपस्थिति दर्षवली. सात दिवसाच्या प्रवचनात शिवपुरानाचे महत्व सांगण्यात आले व वेष भूषाधारी देवी देवतांचे नृत्य सादर करण्यात आले. तरी आजु बाजूच्या गावातील भाविकांनी या संगीतमय शिवमहापुराण कथेचा आस्वाद घेतला.
या शिवपुराणचि सांगता सुदाम कृष्ण शास्त्री महाराज (वृंदावन )उत्तर प्रदेश यांच्या कीर्तननाने झाली. कार्यक्रमाला हजारो च्या संख्यानी उपस्थिति होती. मोवाड नागरित भक्तिमय वातावरण निर्माण होते. आयोजक कृष्णा खडसे व संपूर्ण खडसे परिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात खुप मेहनत घेतली. आयोजाकाच्या वतीने भावीकांचे आभार मानले.