शेगाव – मुस्लिम बांधवासाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरु आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात. मुस्लिम धर्मात रोजा ला अनन्य साधारण महत्व आहे. मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो.
रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात किंवा पाणी सुद्धा पीत नाही. सध्या उन्हाळा सुरु असल्याने रोजा धरणे कठीण समजले जाते मात्र शेगाव येथील सिद्रा फातेमा अहेमद बेग या फक्त ५ वर्षाच्या चिमुकली ने रोजा धरल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे.
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो.या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोजे ठेवत असतात. परंतु इतक्या उन्हाळ्यात ३४ ते ३९ अंश तापमान असतांना उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून शेगाव येथील ईदगाह परिसरातील सिद्रा फातेमा वय ५ वर्ष हिने आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.३७ वाजेपासून ते सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने (अल्लाह) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.