न्युज डेस्क – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI च्या बैठकीत अवांछित कॉल्स आणि मेसेजबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio, Vodafone Idea आणि BSNL यांना TRAI ने अवांछित कॉल्स आणि मेसेजला रोखण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची मदत घेतली जाऊ शकते.
Vi आधीच या दिशेने काम करत आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांसाठी 1 मे 2023 ही तारीख निश्चित केली आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांना प्रमोशनल आणि फेक कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करण्यासाठी टूल्स लाँच करावे लागतील. हे स्पष्ट आहे की 1 मेच्या अंतिम मुदतीनंतर, वापरकर्त्याची फोनवर येणारे अवांछित बनावट संदेश आणि कॉलपासून सुटका होईल.
अवांछित कॉल्स आणि मेसेजला रोखण्यासाठी ट्रायने एक योजना तयार केली आहे. या अंतर्गत, ट्रायच्या वतीने गृह मंत्रालय आणि सायबर सेलकडून प्राप्त झालेल्या बनावट आणि अवांछित कॉलच्या तक्रारी टेलिकॉम कंपन्यांसोबत शेअर केल्या जातील.
यानंतर टेलिकॉम कंपन्या अशा फेक कॉल्स आणि मेसेजवर कारवाई करू शकतील. तसेच, Jio, Airtel BSNL सारख्या दूरसंचार कंपन्यांना बँकिंग, मार्केटिंगसाठी स्वतंत्र सीरीज क्रमांक जारी केले जातील. यामुळे यूजर्स बँकिंग आणि प्रमोशनल कॉल्स आणि कॉल्स सहज ओळखू शकतील.
(टीप – सध्या बँकिंग आणि प्रमोशनल मेसेजसाठी एक प्रकारचा मोबाईल नंबर जारी केला जातो. ट्राय या नियमात बदल करणार आहे.)