अमोल साबळे
नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादीच अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे चार दिवसांत याद्या आणि आधार प्रमाणिकरण करून अनुदान कसे जमा होणार, असा प्रश्न आता पात्र शेतकरी उपस्थित करीत आहेत.
राज्य शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकीत कर्ज शासनाने माफ केले आहे, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध अनुदान करण्यात येत आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, यामध्ये पाच योजनेसाठी पात्र असून, त्यांची खाती बँकांकडून अपलोड करण्यात आली आहेत. आधार प्रमाणीकरण करावे लागणार | जिल्ह्यात अनेक शेतकयांची यादीच अद्यापर्यंत प्रसिद्ध झालेली नाही, ही यादी २७ मार्चनंतर प्रसिद्धही करण्यात आली, तरी यादीत नावे असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करावे लागणार आहे.
त्यामध्ये चार ते पाच दिवस सहज जाणार असल्याने, ३१ मार्चपर्यंतही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे चित्र आहे.यादीत नावे असूनही शेतकरी वंचित प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकयांच्या यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या दोन याद्यांमध्ये नावे असलेल्या अनेक शेतकयांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही.
त्यामुळे या शेतकयांना अजूनही लाभ मिळालेला नसल्याचे चित्र आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान जमा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, २६ मार्चपर्यंत पात्र चित्र आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची खाती होल्ड
पीक कर्ज थकविणाया शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीयकृत बँकांनी होल्ड लावले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून मिळालेले विविध अनुदान व इतर पैसा काढता येत नसल्याचे चित्र आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या याद्याच प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणे कठीण असल्याचे.