Old Pension Scheme : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेला संप अखेर आज मागे घेतला आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आता संपातून माघार घेतला असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अतिशय महत्त्वाची माहिती दिली.
या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी झाली असून राज्यातील कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अतिशय महत्त्वाची माहिती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना खरंच जुनी पेन्शन योजना मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत विश्वास काटकर यांनी सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.