सांगली – ज्योती मोरे.
जत मधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा गोळ्या घालून तसेच, डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरारी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली आहे.
दिनांक 17 मार्च दुपारी पावणे दोन च्या सुमारास जत मधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड हे आपल्या ईनोवा गाडीतून मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना, त्यांचा गोळ्या घालून तसेच डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या प्रकरणातील आरोपी बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वय वर्ष- 27. राहणार- समर्थ कॉलनी.निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने. वय वर्षे- 24.राहणार-मौजे डिग्रज, तालुका-मिरज.आकाश सुधाकर व्हनखंडे. वय वर्षे- 24. राहणार- के. एम. हायस्कूल जवळ, सातारा फाटा, जत. किरण विठ्ठल चव्हाण. वय वर्षे-27. राहणार- आर. आर .कॉलेज जवळ जत. यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि जत पोलीस ठाण्ये यांच्या संयुक्तरित्या कारवाई करत कर्नाटकातील गोकाक मधून ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी माजी नगरसेवक उमेश सावंत फरारी असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.बसवराज तेली यांनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे (जत), सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, संदीप नलवडे,चेतन महाजन ,प्रकाश पाटील,
प्रशांत माळी, ऋतुराज होळकर,विनायक सुतार, नागेश खरात, दीपक गायकवाड,सुनील लोखंडे,कुबेर खोत,सचिन धोत्रे,राजू मुळे,जितेंद्र जाधव, आमसिद्धा खोत, संदीप गुरव,अनिल कोळेकर, सागर लवटे,बिरोबा नरळे,सागर टिंगरे, अच्युत सूर्यवंशी, राजू शिरोळर, संजय कांबळे, निलेश कदम, राहुल जाधव, सोहेल कार्तियानी, अमोल ऐदाळे, वैभव पाटील,उदयसिंह माळी, निसार मुलाणी, कॅप्टन गुंडवाडे, मच्छिंद्र बर्डे आदींनी केली.