Hyundai Creta EV इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत दक्षिण कोरियाची कंपनी Hyundai ची बहुप्रतिक्षित कार लवकरच बाजारात दाखल होणार. कंपनीला ही एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आशादायक इलेक्ट्रिक कार म्हणून लॉन्च करायची आहे. ही कार मारुतीच्या आगामी YY8 EV SUV शी स्पर्धा करणार.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai 2028 पर्यंत भारतात सहा EV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Creta EV ही त्या कारपैकी एक आहे. कंपनी ही कार SU2i EV प्लॅटफॉर्मवर लॉन्च करणार आहे. Hyundai Creta EV एकाच चार्जवर 400 किमी चालेल. कंपनी यामध्ये 134 bhp पॉवरची इलेक्ट्रिक मोटर देऊ शकते असे सांगितले जात आहे. जे 395 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
कारला 39.2 kWh पॉवर लिथियम बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. त्याची बॅटरी सुमारे 6 तासांत चार्ज होईल. कारसोबत 50 kW चा DC चार्जर उपलब्ध असेल. सध्या, कंपनीने कारची किंमत आणि अधिकृत लॉन्च तारखेचा खुलासा केलेला नाही. Autocarindia वेबसाइटनुसार, Hyundai Creta EV 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होईल. क्रेटा ईव्ही 15 ते 30 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध असेल.
क्रेटा ही कंपनीच्या एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आक्रमक कार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये या कारची अनुक्रमे 15037 आणि 10421 युनिट्सची विक्री झाली आहे. ही कंपनीची सर्वाधिक पसंतीची एसयूव्ही आहे.