Wednesday, November 6, 2024
Homeकृषीरायगड | शांतपणे व कायदेशीर रित्या योग्य असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारण...

रायगड | शांतपणे व कायदेशीर रित्या योग्य असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारण नसताना वडखळ पोलिसांची धक्काबुक्की…

किरण बाथम /रायगड

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात खारमाचेला या गावी जे एस डब्ल्यू कंपनीला शेतकऱ्यांच्या जागा कवडी मोलात खरेदी करायच्या आहेत. त्याकरिता शेतांमध्ये खारेपाणी सोडून शेती कायमचे नापिक व्हावे याकरिता पूर्णपणे बेकायदेशीर रित्या खार बंदिस्त्यांमधील उघड्या नष्ट करून तेथे पाईपलाईन टाकली जात आहे. जेणेकरून खारे पाणी शेतीमध्ये घुसून शेती नापीक होईल.

सदर पाईप टाकण्यास खारलँड विभाग पेण तथा महसूल विभाग यांचेकडून परवानगी नाही तरी देखील सुट्टीचा वार घेऊन आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी वडखळ पोलिसांशी संगनमत करून जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांवर धक्काबुक्की करून जबरदस्ती पाईपलाईन टाकत आहेत.

असे गैर कृत्य करणारे पोलिसांवर व कंपनीवर कारवाई करून नैसर्गिक उघाडी पुनर्प्रस्थापित करावी अशी शेतकरी ग्रामस्थांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: